December 24, 2012

Marathi majeshir mhani (part 13)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani



  1.  चढेल तो पडेल
  2.  चने खा‌ईल लोखंडाचे तेव्हा ब्रम्हपदि नाचे
  3.  चमडी जा‌ईल पण दमडी जाणार नाही
  4.  चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही
  5.  चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव
  6.  चांदणे चोराला, उन घुबडाला
  7.  चांभाराची नजर जोड्यावर
  8.  चांभाऱ्याच्या देवाला खेटराची पूजा
  9.  चार आण्याची कोंबडी अऩ बाराण्याचा मसाला
  10.  चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे
  11.  चारजनांनी केली शेती, मोत्या ऐंवजी पिकली माती
  12.  चालत्या गाडीला खीळ घालणे
  13.  चिंती परा ते ये‌ई घरा
  14.  चिता मेलेल्या माणसाला जाळते, पण चिंता जिवंत माणसाला जाळते
  15.  चिपट्यात काय काय करू?
  16.  चुकलेला फकीर मशिदीत
  17.  चुलीतले लाकुड चुलीतच जळाले पाहिजे
  18.  चुलीपुढं हागायचं आनं नशिबात होत म्हणायच
  19.  चोंघीजणी सुना पाणी का ग द्याना
  20.  चोपदार तुपाशी, राजा उपाशी
  21.  चोर तो चोर वर शिरजोर
  22.  चोर नाही तर चोराची लंगोटी
  23.  चोर सोडून संन्याशाला सुळी
  24.  चोराच्या उलट्या बोंबा
  25.  चोराच्या मनांत चांदणं
  26.  चोराच्या वाटा चोरालाच माहीत
  27.  चोराच्या हाती जामदाखान्याच्या किल्या
  28.  चोराला सुटका, आणि गावाला फटका
  29.  चोरावर मोर
  30.  चोरीचा मामला हळू हळू बोंबला
  31.  चोरून पोळी खा म्हटले तर बोंबलून गुळवणी मागायची 
  32.  चोळीला आणि पोळीला कुणी कमी नसते
  33.  जंगलात नाही वावर आणि गावात नाही घर
  34.  जगाच्या कल्याणा संताची विभुती
  35.  जनाची नाही तरी मनाची तरी जरा.

No comments:

Post a Comment