November 16, 2012

Marathi majeshir mhani (part 10)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani




  1.  खतास महाखत
  2.  खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं
  3.  खऱ्याला मरण नाही
  4.  खा‌ई त्याला खवखवे
  5.  खा‌ईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
  6.  खा‌ऊ जाणे तो पचवू जाणे
  7.  खा‌ऊन माजावे पण टाकून माजू नये
  8.  खाजवुन अवधान आणणे
  9.  खाजवुन खरुज काढणे
  10.  खाटकाला शेळी (गाय) धार्जिणी
  11.  खाण तशी माती
  12.  खाणाऱ्याचे खपते, कोठाराचे पोट दुखते
  13.  खाणाऱ्याला चव नाही, रांधणाऱ्याला फुरसत नाही
  14.  खाणे खाण्यातले आणि दुखणे पहिल्यातले
  15.  खाणे बोकडासारखे आणि वाळणे लाकडासारखे
  16.  खातीचे गाल आणि न्हातीचे बाल लपत नाहीत
  17.  खादाड खा‌ऊ लांडग्याचा भा‌ऊ
  18.  खायची बोंब अन हगायचा तरफडा
  19.  खायचे दांत वेगळे, दाखवायचे वेगळे
  20.  खायला आधी, निजायला मधी आणि कामाला कधी
  21.  खायला कहर आणि भु‌ईला भार
  22.  खायला कोंडा अऩ निजायला धोंडा
  23.  खायला बैल, कामाला सैल (खायला ढोकळा, कामाला ठोकळा), (खायला मस्त, कामाला सुस्त)
  24.  खायाला फुटाणे अन टांग्याला आठाणे
  25.  खालल्या घरचे वासे मोजणारा
  26.  खाली मुंडी, पाताळ धुंडी
  27.  खाल्ल्याघरचे वासे मोजणारा
  28.  खिळ्यासाठी नाल गेला, नालीसाठी घोडा गेला
  29.  खिशात नाही आणा अऩ म्हणे मला बाजीराव म्हणा
  30.  खिशात नाही दमडी, बदलली कोंबडी
  31.  खुंटीवरचा कावळा ना घरचा ना दारचा
  32.  खुंट्याची सोडली नि झाडाले बांधली
  33.  खोट्याच्या कपाळी गोटा


No comments:

Post a Comment