November 9, 2012

Marathi majeshir mhani (part 3)

These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani



  1. असं कधी घडे अन सासुला जाव‌ई रडे.
  2. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
  3. असतील चाळ तर फिटतील काळ.
  4. असतील मुली तर पेटतील चुली.
  5. असतील शिते तर जमतील भूते.
  6. असुन नसुन सारखा.
  7. असून अडचण नसून खोळांबा.
  8. असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
  9. असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
  10. असेल दाम तर हो‌ईल काम.
  11. असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.
  12. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
  13. आंधळा विचारतो बहिऱ्याला, वाट जाते हिवाऱ्याला? 
  14. आंधळा सांगतो तंबोरा ऐंकतो.
  15. आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
  16. आंधळीपेक्षा तिरळी बरी.
  17. आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
  18. आ‌ई म्हणते लेक झाले, भा‌ऊ म्हणतात वैंरी झाले.
  19. आ‌ईचा काळ, बायकोचा मवाळ.
  20. आ‌ईची माया अन पोर जा‌ईला वाया.
  21. आ‌ऊचा का‌ऊ तो म्हणे मावसभा‌ऊ.
  22. आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
  23. आखुड शिंगी आणि बहुदुधी.
  24. आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
  25. आग लागल्यावर विहीर खणणे.




No comments:

Post a Comment