These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- जनात बुवा आणि मनात कावा
- जन्मा आला हेला, पाणी वाहता मेला
- जमता दशमा ग्रह
- जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठिण
- जलात राहून माशाशी वैर कशाला?
- जळतं घर भाड्याने कोण घेणार?
- जवा येतील चांगली येळ, गाजराच बी व्हतय केळं
- जशास तसे
- जशी कामना तशी भावना
- जशी देणावळ तशी धुणावळ
- जशी नियत तशी बरकत
- जसा गुरु तसा चेला
- जसा भाव तसा देव
- जाईचा डोळा नि आसवांचा मेळा
- जातीसाठी खावी माती
- जात्यातले रडतात, सुपातले हसतात
- जात्यावर बसले की ओवी सुचते
- जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही
- जाळाशिवाय नाही कढ अऩ माये शिवाय नाही रड
- जावई पाहुणा आला म्हणून रेडा दुध देईल काय?
- जावई माझा भला आणि लेक बाईलबुध्या झाला
- जावयाचं पोर हरामखोर
- जावा जावा आणि उभा दावा
- जावा जावा हेवा देवा
- जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी
- जिकडे सुई तिकडे दोरा
- जिच्या घरी ताक तिचे वरती नाक
- जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उध्दारी
- जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही
- जिथे कमी तिथे आम्ही
- जी नाही गोंदणार ती नाही नांदणार
- जुनं ते सोनं नवं ते हवं
- झगा मगा माझ्याकडे बघा
- झाकली मुठ सव्वालाखाची
- झाड जावो पण हाड न जावो.
No comments:
Post a Comment