These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या
- तरण्याचे झाले कोळसे अन म्हाताऱ्याला आले बाळसे
- तरण्याला लागली कळ, म्हाताऱ्याला आलयं बळ
- तळहाताने चंद्र झाकत नाही
- तळे राखी तो पाणी चाखी
- तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी
- तहान लागल्यावर आड खणणे
- ताकातल्या तुपासारखे, सौंदर्य
- ताकापुरते रामायण
- ताकाला जायचे अनं भांडे लपवायचे
- तागास तूर लागू न देणे
- ताटाखालचं मांजर
- ताटात सांडलं काय नि वाटीत सांडलं काय एकच
- तारेवरची कसरत
- ती नाही घरी नी गमजा करी
- तीन तिघडा काम बिघाडा
- तु दळ माझे, मी दळीण गावच्या पाटलाचे
- तुकाराम बुवांची मेख
- तुझं अऩ माझं जमेना तुझ्यावाचुन करमेना
- तुप खाल्ले की लगेच रुप येत नाही
- तुम्ही करा अऩ आम्ही निस्तरा
- तुरात दान, महापुण्य
- तुला नं मला, घाल कुत्र्याला
- तुळशी तुळशी तुला पाणी कळशी कळशी, पण वेळ मिळेले त्या दिवशी
- तेरड्याचे रंग तीन दिवस
- तेल गेले, तुप गेले, हाती आले धोपाटणे
- तेलणीवर रुसली अंधारात बसली
- तोंड करी बाता अन ढुंगण खाई लाथा
- तोंड दाबून बुक्क्यांचा मार
- तोंडात तीळ भिजत नाही
- तोबऱ्याला पुढे लगामाला मागे
- त्यात काही राम नाही
- दमडीची नाही मिळकत आणि घडीची नाही फुरसत
- दहा गेले पाच उरले
- दहा मरावे पर दहांचा पोशिंदा मरु नये.
These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- जे न देखे रवि ते देखे कवि
- जे पिंडी ते ब्रम्हांडी
- जे फुकट ते पौष्टीक
- जेथे पिकतं तिथे विकतं नाही
- जेवान जेवाव पंगतीत अन मरान मागावं उमदीत
- जो गुण बाळा तो जन्म काळा
- जो नाक धरी, तो पाद करी
- जो श्रमी त्याला काय कमी
- जोकून खाणार, कुंथुन हागणार
- जोवरी पैसा तोवरी बैसा
- ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी
- ज्या गावाला जायचे नाही त्य गावचा रस्ता विचारू नये
- ज्याचं करावं भलं तोच म्हणतो आपलचं खर
- ज्याचं जळतं त्यालाच कळतं
- ज्याचं त्याला आणि गाढव वझ्याला
- ज्याचा त्याला चोप नाही आणि शेजाराला झोप नाही
- ज्याची करावी चाकरी त्याचीच खावी भाकरी
- ज्याची दळ त्याचे बळ
- ज्याचे पदरी पाप त्याला मुली आपोआप
- ज्याच्या हाती ससा तो पारधी
- ज्याच्यासाठी लुगडं तेच उघडं
- ज्याला आहे भाकरी त्याला कशाला चाकरी
- ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल
- ज्याला समजावा कोरड्या पाटीचा तोच निघाला आतल्या गाठीचा
- ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार?
- थांबला तो संपला
- थाट राजाचा, दुकान भाडगुंजाचे
- थेंबे थेंबे तळे साचे
- थोडक्यात नटावे अन प्रेमाने भेटावे
- थोरा घराचे श्वान त्याला देती सर्व मान
- थोरांचे दुखणे आणि मणभर कुंभणे
- येडं पेरलयं अन उगवलयं खुळं
- येथे पाहिजे जातीचे, येळ्या गबाळ्याचे काम नोहे
- येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या
- तरणी पडली धरणी अन म्हातारी झाली हरिणी.
These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- झाडाजवळ छाया, बुवाजवळ बाया
- झाडाला कान्हवले आणि आडात गुळवणी
- झारीतले शुक्राचार्य
- झालं गेलं गंगेला मिळालं
- टक्केटोणपे खाल्ल्यावाचून मोठेपण येत नाही
- टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
- टिटवेदेखील समुद्र आटविते
- गुळाला मुंगळे चिकटतातच
- गोगल गाय पोटात पाय
- गोड बोलून गळा कापणे
- गोफण पडली तिकडे, गोटा पडला इकडे
- गोरा गोमटा आणि कपाळ करंटा
- गोष्ट लहान, सांगण महान
- गोष्टी गोष्टी आणि मेला कोष्टी
- गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट
- ठकास महाठक
- ठण ठण पाळ मदन गोपाळ
- ठिकाण नाही लग्नाला आणि कोण घेते मुलाला
- ठेवले अनंते तैसेची रहावे
- ठोसास ठोसा
- डाग झाला जुना आणि मला प्रतिव्रता म्हणा
- डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही
- डोंगर पोखरून उंदीर काढणे
- डोंगराएवढी हाव, तिळा एवढी धाव
- डोळे आणि कान यांच्यात चार बोटाचे अंतर असते
- डोळ्याला नाही असू, तुझी मेली सासू
- ढवळ्या जातो आणि पवळ्या येतो पण सावळा गोंधळ तसाच राहतो
- ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागला
- ढुंगणाखाली आरी अऩ चांभार पोरं मारी
- ढुंगणाचं काढून डोक्याला बांधणे
- ढोंग धतोरा, हाती कटोरा
- ढोरात ढोर, पोरात पोर
- याची देहा, याची डोळा
- याला द्या त्याला द्या मग सरकाराला काम द्या?
- ये ग साळू दोघं लोळू.
These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- जनात बुवा आणि मनात कावा
- जन्मा आला हेला, पाणी वाहता मेला
- जमता दशमा ग्रह
- जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठिण
- जलात राहून माशाशी वैर कशाला?
- जळतं घर भाड्याने कोण घेणार?
- जवा येतील चांगली येळ, गाजराच बी व्हतय केळं
- जशास तसे
- जशी कामना तशी भावना
- जशी देणावळ तशी धुणावळ
- जशी नियत तशी बरकत
- जसा गुरु तसा चेला
- जसा भाव तसा देव
- जाईचा डोळा नि आसवांचा मेळा
- जातीसाठी खावी माती
- जात्यातले रडतात, सुपातले हसतात
- जात्यावर बसले की ओवी सुचते
- जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही
- जाळाशिवाय नाही कढ अऩ माये शिवाय नाही रड
- जावई पाहुणा आला म्हणून रेडा दुध देईल काय?
- जावई माझा भला आणि लेक बाईलबुध्या झाला
- जावयाचं पोर हरामखोर
- जावा जावा आणि उभा दावा
- जावा जावा हेवा देवा
- जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी
- जिकडे सुई तिकडे दोरा
- जिच्या घरी ताक तिचे वरती नाक
- जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उध्दारी
- जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही
- जिथे कमी तिथे आम्ही
- जी नाही गोंदणार ती नाही नांदणार
- जुनं ते सोनं नवं ते हवं
- झगा मगा माझ्याकडे बघा
- झाकली मुठ सव्वालाखाची
- झाड जावो पण हाड न जावो.
These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- चढेल तो पडेल
- चने खाईल लोखंडाचे तेव्हा ब्रम्हपदि नाचे
- चमडी जाईल पण दमडी जाणार नाही
- चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही
- चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव
- चांदणे चोराला, उन घुबडाला
- चांभाराची नजर जोड्यावर
- चांभाऱ्याच्या देवाला खेटराची पूजा
- चार आण्याची कोंबडी अऩ बाराण्याचा मसाला
- चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे
- चारजनांनी केली शेती, मोत्या ऐंवजी पिकली माती
- चालत्या गाडीला खीळ घालणे
- चिंती परा ते येई घरा
- चिता मेलेल्या माणसाला जाळते, पण चिंता जिवंत माणसाला जाळते
- चिपट्यात काय काय करू?
- चुकलेला फकीर मशिदीत
- चुलीतले लाकुड चुलीतच जळाले पाहिजे
- चुलीपुढं हागायचं आनं नशिबात होत म्हणायच
- चोंघीजणी सुना पाणी का ग द्याना
- चोपदार तुपाशी, राजा उपाशी
- चोर तो चोर वर शिरजोर
- चोर नाही तर चोराची लंगोटी
- चोर सोडून संन्याशाला सुळी
- चोराच्या उलट्या बोंबा
- चोराच्या मनांत चांदणं
- चोराच्या वाटा चोरालाच माहीत
- चोराच्या हाती जामदाखान्याच्या किल्या
- चोराला सुटका, आणि गावाला फटका
- चोरावर मोर
- चोरीचा मामला हळू हळू बोंबला
- चोरून पोळी खा म्हटले तर बोंबलून गुळवणी मागायची
- चोळीला आणि पोळीला कुणी कमी नसते
- जंगलात नाही वावर आणि गावात नाही घर
- जगाच्या कल्याणा संताची विभुती
- जनाची नाही तरी मनाची तरी जरा.
These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- घटकेत सौभाग्यवती घटकेत गंगा भागीरथी
- घटाकभर नाही माप अन रात्री येई हिवताप
- घर गेले विटाळा शेत गेले कटाळा
- घर चंद्रमोळी पण बायकोला साडीचोळी
- घर ना दार चावडी बिऱ्हाड (घर ना दार वाऱ्यावर बिऱ्हाड)
- घर फिरले की वासेही फिरतात
- घर साकड नि बाईल भाकड
- घरचा उंबरठा दारालाच माहीत
- घरची करती देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा
- घरचे झाले थोडे अऩ व्याहीने धाडले घोडे
- घरच्याच चिंचेने दात आंबलेत त्यात व्याहयाने धाडलाय वानवळा
- घरांत नाही दाणा मला बाजीराव म्हणा
- घराची कळा अंगण सांगते
- घरात घरघर चर्चा गावभर
- घरात घाण, दारात घाण, कुठे गेली गोरीपान
- घरात नाही एक तीळ पण मिशांना देतो पीळ
- घरात नाही कौल, रिकामा डौल
- घरात नाही तुरी भट भटणीला मारी
- घरात नाही दाणा मला बाजीराव म्हणा
- घरासारखा गुण, सासू तशी सून
- घरी नको झालेल्या माणसाला रस्त्यावरची माकडे पण दगड मारतात
- घरोघरी त्याच परी, सांगेना तीच बरी
- घरोघरी मातीच्या चुली
- घाईत घाई अन म्हातारीला न्हाणं येई
- घाण्याचा बैल
- घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी
- घुगऱ्या मुठभर, सारी रात मरमर
- घुसळतीपेक्षा उकळतीचे घरी अधिक
- घे सुरी आणि घाल उरी
- घेणे न देणे, कंदिल लावून जाणे
- घोंगड अडकलं
- घोडं झालय मराया बसणारा म्हणतो मी नवा
- घोडामैदान जवळ असणे
- घोडे खाई भाडे
- घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर.
These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- "ग" ची बाधा झाली
- गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे
- गंगेत घोडं न्हालं
- गरज सरो अऩ वैद्य मरो
- गरजवंताला अक्कल नसते
- गरजेल तो पडेल काय?
- गरीबाच्या दाराला सावकाराची कडी
- गरीबानं खपावं, धनिकाने चाखावं
- गळा नाही सरी, सुखी निंद्रा करी
- गळ्यातले तुटले ओटीत पडले
- गवयाचे मुल सुरांनीच रडणार
- गांवचा गांव जळे आणि हनुमान बेंबी चोळे
- गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली
- गाठ पडली ठकाठका
- गाढव माजला की तो अखेर आपलेच मुत पितो
- गाढवं मेलं ऒझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने (घोडी मेली ओझ्यानं नि शिंगरू मेलं हेलपाट्यानं)
- गाढवा समोर वाचली गिता, कालचा गोंधळ बरा होता
- गाढवाचा गोंधळ लाथाचा सुकाळ
- गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी
- गाढवाच्या लग्नांला शेंडीपासून तयारी
- गाढवाने शेत खाल्ले, पाप ना पुण्य
- गाढवाला गुळाची चवं काय?
- गाता गळा, शिंपता मळा
- गावंढ्या गावात गाढवी सवाशीण
- गाव करी ते राव न करी
- गाव करील ते राव करील काय?
- गाव तिथे उकिरडा
- गावात नाही झाड अनं म्हणे एरंड्याला आला पाड
- गावात घर नाही रानात शेत नाही
- गुप्तदान महापुण्य
- गुरवाचे लक्ष निविद्यावर (नैवेद्यावर)
- गुरुची विद्या, गुरुलाच फळली
- गुलाबाचे कांटे जसे आईचे धपाटे
- गुळवणी नाहीतर गुळाचार कुठून?
- गुळाचाच गणपती, गुळाचाच नेवैद्य
These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- खतास महाखत
- खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं
- खऱ्याला मरण नाही
- खाई त्याला खवखवे
- खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
- खाऊ जाणे तो पचवू जाणे
- खाऊन माजावे पण टाकून माजू नये
- खाजवुन अवधान आणणे
- खाजवुन खरुज काढणे
- खाटकाला शेळी (गाय) धार्जिणी
- खाण तशी माती
- खाणाऱ्याचे खपते, कोठाराचे पोट दुखते
- खाणाऱ्याला चव नाही, रांधणाऱ्याला फुरसत नाही
- खाणे खाण्यातले आणि दुखणे पहिल्यातले
- खाणे बोकडासारखे आणि वाळणे लाकडासारखे
- खातीचे गाल आणि न्हातीचे बाल लपत नाहीत
- खादाड खाऊ लांडग्याचा भाऊ
- खायची बोंब अन हगायचा तरफडा
- खायचे दांत वेगळे, दाखवायचे वेगळे
- खायला आधी, निजायला मधी आणि कामाला कधी
- खायला कहर आणि भुईला भार
- खायला कोंडा अऩ निजायला धोंडा
- खायला बैल, कामाला सैल (खायला ढोकळा, कामाला ठोकळा), (खायला मस्त, कामाला सुस्त)
- खायाला फुटाणे अन टांग्याला आठाणे
- खालल्या घरचे वासे मोजणारा
- खाली मुंडी, पाताळ धुंडी
- खाल्ल्याघरचे वासे मोजणारा
- खिळ्यासाठी नाल गेला, नालीसाठी घोडा गेला
- खिशात नाही आणा अऩ म्हणे मला बाजीराव म्हणा
- खिशात नाही दमडी, बदलली कोंबडी
- खुंटीवरचा कावळा ना घरचा ना दारचा
- खुंट्याची सोडली नि झाडाले बांधली
- खोट्याच्या कपाळी गोटा
These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- कावळ्याचे दांत शोधण्यासारखे (मोजण्यासारखे)
- कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
- कावळ्याने कितीही अंग घासले तरी बगळा होत नाही
- कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते
- काशी केली, गंगा केली, नशिबाची कटकट नाही गेली
- कुंपणच शेत खातय तर जाब विचारायचा कुणाला?
- कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर येईलच
- कुठे इंद्राची ऐरावत आणि कुठे शांभाट्टाची तट्टानी
- कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा
- कुठे तरी पाल चुकचुकतेय
- कुठेही जा, पळसाला पाने तीनच
- कुडास कान ठेवी ध्यान
- कुडी तशी पुडी
- कुणाचा कुणाला पायपूस नाही
- कुणाची म्हैस, कुणाला ऊठबैस
- कुणाला कशाचे बलुत्याला पशाचे
- कुणी वंदा, कुणी निंदा, माझा स्वहिताचा धंदा
- कुत्र्या मांजराचे वैर
- कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच
- कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ
- कुसंतनापेक्षा निसंतान बरे
- केला जरी पोत बरेच खाली, ज्वाळा तरी ते वर उफाळी
- केल्याने होत आहे आधी केले ची पाहिजे
- केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले
- केळीवर नारळी अन घर चंद्रमोळी
- केळ्याचा डोंगर, देई पैशाचा डोंगर
- केवड्याने दान वाटले आणि गावात नगारे वाजले
- कोंड्याचा मांडा करुन खाणे
- कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही
- कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं (कोणाला कशाचे मळणीला लसणाचे)
- कोल्हा काकडीला राजी
- कोल्ह्यास द्राक्षे आंबट
- कोळसा कितीही उगाळला तरी काळाच
These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- का ग बाई उभी, घरात दोघी तिघी
- काकडीची चोरी, फाशीची शिक्षा
- काका मामांनी भरला गांव, पाणी प्यायला कोठे जाव?
- काखेत कळसा अऩ गावाला वळसा
- काजव्याकडून सुर्याची समीक्षा
- काट्याचा नायटा होतो
- काट्याने काटा काढायचा
- काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही
- काडी चोर तो माडी चोर
- कानात बुगडी, गावात फुगडी
- काप गेले नि भोका रवली(भोके राहिली)
- काम कवडीचं नाही अनं फुरसत घडीची नाही
- काम ना धाम अनं उघड्या अंगाला घाम
- काम नाही कवडीचं, रिकामपण नाही घडीच
- काम नाही घरी सांडून भरी
- काम ऩ धंदा, हरी गोविंदा
- कामाचा ना धामाचा भाकरी खातो नेमाचा
- कामापुरता मामा अऩ ताकापुरती आजी
- काय करु अऩ कस करु?
- काय बाई अशी तु शिकवले तशी
- काळ आला होता पण वेळ आली नव्हती
- काळी बेंद्री एकाची, सुंदर बायको लोकाची
- कावळा गेला उडून गू खा चाटून
- कावळा घातला कारभारी गु आणला दरबारी
- कावळा बसायला आणि फांदी तुटायला
These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं
- कच्च्या गुरुचा चेला
- कठीण समय येता कोण कामास येतो
- कडु कारले तुपात तळले, साखरेत घोळले, कडू ते कडूच
- कण्हती कुथती, मलिद्याला उठती
- कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी
- कपटि मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा
- कपिलाषष्टीचा योग
- कमळ भुंग्याला अन चिखल बेडकाला
- कर नाही त्याला ड़र कशाला?
- करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी होईल का?
- करणी कसायची, बोलणी मालभावची
- करतेस काय वाती अन ऐकतेस काय माती
- करवंदीच्या जाळीला काटे
- करायला गेलो एक अऩ झाले एक(भलतेच)
- करावे तसे भरावे
- करीन ती पूर्व
- करुन करुन भागले अनं देवपुजेला लागले
- करुन गेला गाव आणि कांदळकराचे नाव
- करू गेले काय? अन उलटे झाले काय?
- कर्कशेला कलह गोड, पद्मीनीला प्रीती गोड
- कळते पण वळत नाही
- कशात काय अन फाटक्यात पाय
- कशात ना मशात, माकड तमाशात
- कष्ट करणार त्याला देव देणार
These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- आयत्या बिळात नागोबा
- आराम हराम आहे
- आरोग्य हीच धनसंपत्ती
- आलथा पसा पालथा पसा माकडा तुझा संसार कसा?
- आला भेटीला धरला वेठीला
- आली अंगावर, घेतली शिंगावर
- आली चाळीशी, करा एकादशी
- आली सर तर गंगेत भर
- आलीया भोगासी असावे सादर
- आले मी नांदायला, मडके नाही रांधायला
- आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला
- आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान
- आळश्याला दुप्पट काम
- आळ्श्याला गंगा दूर
- आवडतीचा शेंबुड गोड आणि नावडतीचे मीठ आळणी
- आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर
- आवळा देवून भोपळा काढणे (आवळा देवून कोहळा काढणे)
- आवसबाई तुझ्याकडे पुतनबाई माझ्याकडे
- आवा निघाली पंढरपुरा, वेशीपासुन आली माघारा
- आशा सुटेना अन देव भेटेना
- आसू ना मासू, कुत्र्याची सासू
- ओ म्हणता ठो येईना
- ओठात एक आणि पोटात एक
- ओठी ते पोटी
- ओल्या बरोबर सुके जळते
- ओळख ना पाळख अनं मला म्हणा लोकमान्य टिळक
- ओळखीचा चोर जीवे मारी
- ओसाड गावी एरंडी बळी
- औटघटकेचे राज्य
- औषधावाचून खोकला गेला
These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- आपण आरे म्हटले की कारे आलेच
- आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार
- आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच
- आपण सुखी तर जग सुखी
- आपलंच घर, हागुन भर
- आपला आळी, कुत्रा बाळी
- आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या
- आपला हात, जग्गन्नाथ
- आपलाच बोल, आपलाच ढोल
- आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून
- आपली पाठ आपल्याला दिसत नाही
- आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी
- आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून
- आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे
- आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन
- आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ
- आपले सांभाळावे अन दुसऱ्याला यश द्यावे
- आपलेच दांत अऩ आपलेच ओठ
- आपल्या कानी सात बाळ्या
- आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते
- आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते
- आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड
- आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?
- आय नाय त्याला काय नाय
- आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जावई उदार
These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- आगीशिवाय धूर दिसत नाही
- आचार भ्रष्टी, सदा कष्टी
- आज अंबारी, उद्या झोळी धरी
- आजा मेला नातू झाला, घरची माणसे बरोबर
- आठ हात लाकुड, नऊ हात धलपी
- आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली
- आडजीभ खाई अऩ पडजीभ बोंबलत जाई
- आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
- आत्याबाईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो
- आधणातले रडतात, सुपातले हसतात
- आधिच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा
- आधी करा मग भरा
- आधी करावे मग सांगावे
- आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण
- आधी गुंतू नये, मग कुंथु नये
- आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण
- आधी नमस्कार मग चमत्कार
- आधी पोटोबा, मग विठोबा
- आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे
- आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना
- आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास
- आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ
- आधीच नव्हती हौस त्यात पडला पाऊस
- आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
- आपण आपल्याच सावलीला भितो
These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
- असं कधी घडे अन सासुला जावई रडे.
- असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
- असतील चाळ तर फिटतील काळ.
- असतील मुली तर पेटतील चुली.
- असतील शिते तर जमतील भूते.
- असुन नसुन सारखा.
- असून अडचण नसून खोळांबा.
- असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
- असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
- असेल दाम तर होईल काम.
- असेल हरी तर देईल खाटल्यावरी.
- आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
- आंधळा विचारतो बहिऱ्याला, वाट जाते हिवाऱ्याला?
- आंधळा सांगतो तंबोरा ऐंकतो.
- आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
- आंधळीपेक्षा तिरळी बरी.
- आई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
- आई म्हणते लेक झाले, भाऊ म्हणतात वैंरी झाले.
- आईचा काळ, बायकोचा मवाळ.
- आईची माया अन पोर जाईला वाया.
- आऊचा काऊ तो म्हणे मावसभाऊ.
- आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
- आखुड शिंगी आणि बहुदुधी.
- आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
- आग लागल्यावर विहीर खणणे.
These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
- अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
- अढीच्या दिढी सावकाराची सढी.
- अती केला अनं मसनात गेला.
- अती झालं अऩ हसू आलं.
- अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
- अती तिथं माती.
- अती परीचयात आवज्ञा.
- अती राग भिक माग.
- अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
- अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
- अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
- अपयश हे मरणाहून वोखटे.
- अपापाचा माल गपापा.
- अपुऱ्या घड्याला डबडब फार.
- अप्पा मारी गप्पा.
- अर्धा वैद्या मरणास खाद्य.
- अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
- अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
- अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
- अल्प बुध्दी, बहु गर्वी.
- अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
- अळवाची खाज़ अळवाला ठाऊक.
- अळी मिळी गुपचिळी.
- अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई डॉक्टर.
- अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.
These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani (part 2)
- अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ.
- अंगापेक्षा बोंगा जास्ती.
- अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
- अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
- अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
- अंथरूण पाहून पाय पसरावेत.
- अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
- अंधळ्याचा हात बुडकुल्यात.
- अंधारात केले पण उजेडात आले.
- अंधेर नगरी चौपट राजा.
- अकिती आणि सणाची निचिती.
- अक्कल खाती जमा.
- अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल.
- अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
- अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
- अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
- अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
- अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
- अघळ पघळ अन घाल गोंधळ.
- अघळ पघळ वेशीला ओघळ.
- अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
- अडला हरी गाढवाचे पाय धरी.
- अडली गाय खाते काय.
- अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
- अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.