These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- आपण आरे म्हटले की कारे आलेच
- आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार
- आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच
- आपण सुखी तर जग सुखी
- आपलंच घर, हागुन भर
- आपला आळी, कुत्रा बाळी
- आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या
- आपला हात, जग्गन्नाथ
- आपलाच बोल, आपलाच ढोल
- आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून
- आपली पाठ आपल्याला दिसत नाही
- आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी
- आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून
- आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे
- आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन
- आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ
- आपले सांभाळावे अन दुसऱ्याला यश द्यावे
- आपलेच दांत अऩ आपलेच ओठ
- आपल्या कानी सात बाळ्या
- आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते
- आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते
- आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड
- आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?
- आय नाय त्याला काय नाय
- आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जावई उदार
No comments:
Post a Comment