These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- खतास महाखत
- खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं
- खऱ्याला मरण नाही
- खाई त्याला खवखवे
- खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
- खाऊ जाणे तो पचवू जाणे
- खाऊन माजावे पण टाकून माजू नये
- खाजवुन अवधान आणणे
- खाजवुन खरुज काढणे
- खाटकाला शेळी (गाय) धार्जिणी
- खाण तशी माती
- खाणाऱ्याचे खपते, कोठाराचे पोट दुखते
- खाणाऱ्याला चव नाही, रांधणाऱ्याला फुरसत नाही
- खाणे खाण्यातले आणि दुखणे पहिल्यातले
- खाणे बोकडासारखे आणि वाळणे लाकडासारखे
- खातीचे गाल आणि न्हातीचे बाल लपत नाहीत
- खादाड खाऊ लांडग्याचा भाऊ
- खायची बोंब अन हगायचा तरफडा
- खायचे दांत वेगळे, दाखवायचे वेगळे
- खायला आधी, निजायला मधी आणि कामाला कधी
- खायला कहर आणि भुईला भार
- खायला कोंडा अऩ निजायला धोंडा
- खायला बैल, कामाला सैल (खायला ढोकळा, कामाला ठोकळा), (खायला मस्त, कामाला सुस्त)
- खायाला फुटाणे अन टांग्याला आठाणे
- खालल्या घरचे वासे मोजणारा
- खाली मुंडी, पाताळ धुंडी
- खाल्ल्याघरचे वासे मोजणारा
- खिळ्यासाठी नाल गेला, नालीसाठी घोडा गेला
- खिशात नाही आणा अऩ म्हणे मला बाजीराव म्हणा
- खिशात नाही दमडी, बदलली कोंबडी
- खुंटीवरचा कावळा ना घरचा ना दारचा
- खुंट्याची सोडली नि झाडाले बांधली
- खोट्याच्या कपाळी गोटा
No comments:
Post a Comment