- अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
- अढीच्या दिढी सावकाराची सढी.
- अती केला अनं मसनात गेला.
- अती झालं अऩ हसू आलं.
- अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
- अती तिथं माती.
- अती परीचयात आवज्ञा.
- अती राग भिक माग.
- अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
- अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
- अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
- अपयश हे मरणाहून वोखटे.
- अपापाचा माल गपापा.
- अपुऱ्या घड्याला डबडब फार.
- अप्पा मारी गप्पा.
- अर्धा वैद्या मरणास खाद्य.
- अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
- अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
- अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
- अल्प बुध्दी, बहु गर्वी.
- अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
- अळवाची खाज़ अळवाला ठाऊक.
- अळी मिळी गुपचिळी.
- अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई डॉक्टर.
- अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.
November 9, 2012
Marathi majeshir mhani (part 2)
These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment