These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- आगीशिवाय धूर दिसत नाही
- आचार भ्रष्टी, सदा कष्टी
- आज अंबारी, उद्या झोळी धरी
- आजा मेला नातू झाला, घरची माणसे बरोबर
- आठ हात लाकुड, नऊ हात धलपी
- आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली
- आडजीभ खाई अऩ पडजीभ बोंबलत जाई
- आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
- आत्याबाईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो
- आधणातले रडतात, सुपातले हसतात
- आधिच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा
- आधी करा मग भरा
- आधी करावे मग सांगावे
- आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण
- आधी गुंतू नये, मग कुंथु नये
- आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण
- आधी नमस्कार मग चमत्कार
- आधी पोटोबा, मग विठोबा
- आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे
- आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना
- आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास
- आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ
- आधीच नव्हती हौस त्यात पडला पाऊस
- आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
- आपण आपल्याच सावलीला भितो
No comments:
Post a Comment