These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- कावळ्याचे दांत शोधण्यासारखे (मोजण्यासारखे)
- कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
- कावळ्याने कितीही अंग घासले तरी बगळा होत नाही
- कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते
- काशी केली, गंगा केली, नशिबाची कटकट नाही गेली
- कुंपणच शेत खातय तर जाब विचारायचा कुणाला?
- कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर येईलच
- कुठे इंद्राची ऐरावत आणि कुठे शांभाट्टाची तट्टानी
- कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा
- कुठे तरी पाल चुकचुकतेय
- कुठेही जा, पळसाला पाने तीनच
- कुडास कान ठेवी ध्यान
- कुडी तशी पुडी
- कुणाचा कुणाला पायपूस नाही
- कुणाची म्हैस, कुणाला ऊठबैस
- कुणाला कशाचे बलुत्याला पशाचे
- कुणी वंदा, कुणी निंदा, माझा स्वहिताचा धंदा
- कुत्र्या मांजराचे वैर
- कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच
- कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ
- कुसंतनापेक्षा निसंतान बरे
- केला जरी पोत बरेच खाली, ज्वाळा तरी ते वर उफाळी
- केल्याने होत आहे आधी केले ची पाहिजे
- केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले
- केळीवर नारळी अन घर चंद्रमोळी
- केळ्याचा डोंगर, देई पैशाचा डोंगर
- केवड्याने दान वाटले आणि गावात नगारे वाजले
- कोंड्याचा मांडा करुन खाणे
- कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही
- कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं (कोणाला कशाचे मळणीला लसणाचे)
- कोल्हा काकडीला राजी
- कोल्ह्यास द्राक्षे आंबट
- कोळसा कितीही उगाळला तरी काळाच
No comments:
Post a Comment