These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- "ग" ची बाधा झाली
- गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे
- गंगेत घोडं न्हालं
- गरज सरो अऩ वैद्य मरो
- गरजवंताला अक्कल नसते
- गरजेल तो पडेल काय?
- गरीबाच्या दाराला सावकाराची कडी
- गरीबानं खपावं, धनिकाने चाखावं
- गळा नाही सरी, सुखी निंद्रा करी
- गळ्यातले तुटले ओटीत पडले
- गवयाचे मुल सुरांनीच रडणार
- गांवचा गांव जळे आणि हनुमान बेंबी चोळे
- गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली
- गाठ पडली ठकाठका
- गाढव माजला की तो अखेर आपलेच मुत पितो
- गाढवं मेलं ऒझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने (घोडी मेली ओझ्यानं नि शिंगरू मेलं हेलपाट्यानं)
- गाढवा समोर वाचली गिता, कालचा गोंधळ बरा होता
- गाढवाचा गोंधळ लाथाचा सुकाळ
- गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी
- गाढवाच्या लग्नांला शेंडीपासून तयारी
- गाढवाने शेत खाल्ले, पाप ना पुण्य
- गाढवाला गुळाची चवं काय?
- गाता गळा, शिंपता मळा
- गावंढ्या गावात गाढवी सवाशीण
- गाव करी ते राव न करी
- गाव करील ते राव करील काय?
- गाव तिथे उकिरडा
- गावात नाही झाड अनं म्हणे एरंड्याला आला पाड
- गावात घर नाही रानात शेत नाही
- गुप्तदान महापुण्य
- गुरवाचे लक्ष निविद्यावर (नैवेद्यावर)
- गुरुची विद्या, गुरुलाच फळली
- गुलाबाचे कांटे जसे आईचे धपाटे
- गुळवणी नाहीतर गुळाचार कुठून?
- गुळाचाच गणपती, गुळाचाच नेवैद्य
No comments:
Post a Comment