Marathi majeshir mhani (part 2)
- अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ.
- अंगापेक्षा बोंगा जास्ती.
- अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
- अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
- अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
- अंथरूण पाहून पाय पसरावेत.
- अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
- अंधळ्याचा हात बुडकुल्यात.
- अंधारात केले पण उजेडात आले.
- अंधेर नगरी चौपट राजा.
- अकिती आणि सणाची निचिती.
- अक्कल खाती जमा.
- अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल.
- अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
- अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
- अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
- अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
- अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
- अघळ पघळ अन घाल गोंधळ.
- अघळ पघळ वेशीला ओघळ.
- अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
- अडला हरी गाढवाचे पाय धरी.
- अडली गाय खाते काय.
- अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
- अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
No comments:
Post a Comment