These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं
- कच्च्या गुरुचा चेला
- कठीण समय येता कोण कामास येतो
- कडु कारले तुपात तळले, साखरेत घोळले, कडू ते कडूच
- कण्हती कुथती, मलिद्याला उठती
- कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी
- कपटि मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा
- कपिलाषष्टीचा योग
- कमळ भुंग्याला अन चिखल बेडकाला
- कर नाही त्याला ड़र कशाला?
- करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी होईल का?
- करणी कसायची, बोलणी मालभावची
- करतेस काय वाती अन ऐकतेस काय माती
- करवंदीच्या जाळीला काटे
- करायला गेलो एक अऩ झाले एक(भलतेच)
- करावे तसे भरावे
- करीन ती पूर्व
- करुन करुन भागले अनं देवपुजेला लागले
- करुन गेला गाव आणि कांदळकराचे नाव
- करू गेले काय? अन उलटे झाले काय?
- कर्कशेला कलह गोड, पद्मीनीला प्रीती गोड
- कळते पण वळत नाही
- कशात काय अन फाटक्यात पाय
- कशात ना मशात, माकड तमाशात
- कष्ट करणार त्याला देव देणार
No comments:
Post a Comment