These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.
Marathi majeshir mhani
- जे न देखे रवि ते देखे कवि
- जे पिंडी ते ब्रम्हांडी
- जे फुकट ते पौष्टीक
- जेथे पिकतं तिथे विकतं नाही
- जेवान जेवाव पंगतीत अन मरान मागावं उमदीत
- जो गुण बाळा तो जन्म काळा
- जो नाक धरी, तो पाद करी
- जो श्रमी त्याला काय कमी
- जोकून खाणार, कुंथुन हागणार
- जोवरी पैसा तोवरी बैसा
- ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी
- ज्या गावाला जायचे नाही त्य गावचा रस्ता विचारू नये
- ज्याचं करावं भलं तोच म्हणतो आपलचं खर
- ज्याचं जळतं त्यालाच कळतं
- ज्याचं त्याला आणि गाढव वझ्याला
- ज्याचा त्याला चोप नाही आणि शेजाराला झोप नाही
- ज्याची करावी चाकरी त्याचीच खावी भाकरी
- ज्याची दळ त्याचे बळ
- ज्याचे पदरी पाप त्याला मुली आपोआप
- ज्याच्या हाती ससा तो पारधी
- ज्याच्यासाठी लुगडं तेच उघडं
- ज्याला आहे भाकरी त्याला कशाला चाकरी
- ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल
- ज्याला समजावा कोरड्या पाटीचा तोच निघाला आतल्या गाठीचा
- ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार?
- थांबला तो संपला
- थाट राजाचा, दुकान भाडगुंजाचे
- थेंबे थेंबे तळे साचे
- थोडक्यात नटावे अन प्रेमाने भेटावे
- थोरा घराचे श्वान त्याला देती सर्व मान
- थोरांचे दुखणे आणि मणभर कुंभणे
- येडं पेरलयं अन उगवलयं खुळं
- येथे पाहिजे जातीचे, येळ्या गबाळ्याचे काम नोहे
- येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या
- तरणी पडली धरणी अन म्हातारी झाली हरिणी.
No comments:
Post a Comment